राज्यात लवकरच पब्लिक सिक्युरिटी अ‍ॅक्ट तयार करणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

04 Feb 2024 17:52:35

Fadanvis


नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या गडचिरोली दौऱ्यावर असून त्यांनी येथील अतिदुर्गम असलेल्या वांगेतुरी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी राज्यात लवकरच पब्लिक सिक्युरिटी अ‍ॅक्ट तयार करणार असल्याचे म्हटले आहे. 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "वांगेतुरी या गावाच्या आसपासच्या गावांमध्ये कुणीही जाऊ शकत नव्हतं. इथल्या लोकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरं जावं लागत होतं. पण पोलिसांनी अत्यंत शिताफिने या दुर्गम भागात पोलिस स्टेशन आणि रस्त्यांचं बांधकाम केल्याने मोठ्या प्रमाणात आपले प्रभुत्व निर्माण झाले आहे."
 
"येथील पोलिस स्टेशन हे एकीकडे नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी तर दुसरीकडे सामान्य जनतेमध्ये सरकारच्या योजना पोहोचवणे आणि जनतेच्या मनात विश्वास तयार करण्यासाठी आहे. बिरसा मुंडा सडक योजना ही प्रभावीपणे गडचिरोली मध्ये राबविली जाणार आहे. तसेच नक्षलवादाशी लढण्यासाठी लवकरच राज्यात पब्लिक सिक्युरिटी अ‍ॅक्ट तयार करण्याचा विचार करत आहोत," असेही त्यांनी म्हटले आहे.



Powered By Sangraha 9.0