भारतातील बिबट्यांची संख्या जाहीर; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
29-Feb-2024
Total Views | 282
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - केंद्रीय पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्रालयाने गुरुवार दि. २९ फेब्रुवारी रोजी देशातील बिबट्यांच्या प्रगणनेचा अहवाल प्रकाशित केला. (maharastra leopard) त्यानुसार देशातील संरक्षित वनक्षेत्रांमध्ये बिबट्यांची संख्या अंदाजे १३ हजार ८७४ असल्याचे सांगण्यात आले आहे. देशातील बिबट्यांच्यासंख्येत मध्यप्रदेशचा पहिला क्रमांक असून महाराष्ट्र दुसऱ्या, तर कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे. (maharastra leopard)
बिबट्या प्रगणनेचा पाचवा अहवाल गुरुवारी प्रकाशित झाला. हा अहवाल राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण, भारतीय वन्यजीव संस्थांनयांनी देशीतील विविध राज्यांच्या वन विभागाच्या मदतीने तयार केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील संरक्षित वनक्षेत्रांमध्येबिबट्यांची संख्या अंदाजे १,९८५ असल्याचे सांगण्यात आली आहे. २०१८ साली ही संख्या १,६९० होती. या संख्येत १२२ बिबट्यांची भर पडली आहे. राज्यातील संरक्षित क्षेत्रांमध्ये आढळणाऱ्या एकूण संख्येपैकी जवळपास ७५ टक्के संख्या ही संरक्षित वनक्षेत्राबाहेर राहत असल्याची महत्त्वपूर्ण नोंदअहवालात नमूद करण्यात आली आहे. विदर्भ भूप्रदेशातील चंद्रपूर, ब्रम्हपूरी प्रादेशिक विभाग आणि मेळघाट, ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील बिबट अधिवासाची घनता २०१८ सालच्या तुलनेत वाढली आहे. तर सह्याद्री भूप्रदेशाचा विचार केल्यास सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बिबट अधिवासाच्या घनतेमध्ये वाढ झाली आहे. मानव-बिबट संघर्ष आणि अवयवांची तस्करी हे महाराष्ट्रात बिबट्यांना असणारे प्रमुख धोके आहेत.