अलिबागजवळ असलेल्या पर्वतनिवासी दत्त मंदिरातील दत्तमहाराजांच्या पादुकांचा 'Palkhi Parikrama Sohla' गुरुवार होणार आहे. सोहळ्याचे पाचवे वर्ष असून 'दत्तकृपा अन्नछत्र ट्रस्ट, अलिबाग'चे अध्यक्ष महेश मोरे यांनी भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
रायगड : अलिबागच्या चौल भोवाळे येथे असलेल्या पर्वतनिवासी दत्त मंदिरातील दत्तमहाराजांच्या पादुकांचा 'पालखी परिक्रमा सोहळा' गुरुवार, दि. २९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वा. संपन्न होणार आहे. 'दत्तकृपा अन्नछत्र ट्रस्ट, अलिबाग' आयोजित पालखी परिक्रमा सोहळ्याचे यंदाचे पाचवे वर्ष आहे.
पर्वतनिवासी दत्त मंदिरातून पालखीला सुरुवात होईल. त्यानंतर चौल चौकी, चौल नाका, वरंडे फाटा, देवघर, सराई, हनुमानपाडा यामार्गे संध्याकाळी ७ वा. पर्यंत पालखी पुन्हा मुख्य मंदिरात येईल. डोंगराभोवती घातलेली ही साधारण १६ किमी.ची पायी प्रदक्षिणा असेल. अलिबाग, रेवदंडा, रोहा, मुंबई, पुणे अशा विविध ठिकाणांहून दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने पालखी सोहळ्याला येतात.
आपण हे वाचलंत का? : ४० वर्षांनंतर रायगडावर जाणाऱ्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलेलं नाही!
पालखी परिक्रमा सोहळ्याच्या शेवटी मंदिरात महाआरती होऊन भाविकांमध्ये महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल, असे दत्तकृपा अन्नछत्र ट्रस्ट, अलिबागचे अध्यक्ष महेश मोरे यांनी सांगितले.