मुंबई : जम्मू-काश्मिरमधून ‘कलम३७० हटवण्यामागचा संघर्ष, काश्मीरचा इतिहास व आतंकवादाची पार्श्वभूमी, राजकीय हस्तक्षेप या सर्व सत्य घटनांची बांधणी 'आर्टिकल ३७०' या चित्रपटात दिग्दर्शक आदित्य जांभळे यांनी मांडली आहे. २३ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी तर या चित्रपटाचे कौतुक केलेच, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील विशेष कौतुक केले होते. आत्तापर्यंत या चित्रपटाने ३४.७१ कोटींची कमाई केली आहे.
‘आर्टिकल ३७०’ याच चित्रपटाला प्रेक्षकांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ६.१२ कोटी, दुसऱ्या दिवशी ९.८ कोटी, तिसऱ्या दिवशी १०.२५ कोटी कमावले आहेत.
आदित्य जांभळे दिग्दर्शित, लिखित आणि आदित्य धर निर्मित या चित्रपटात यामी गौतम प्रियामणी, वैभव तत्ववादी, अरुण गोविल, किरण करमरकर, असित गोपीनाथ रेडिज, किरण करमरकर, अश्वनी कुमार आणि इरावती हर्षेसारखे मातब्बक कलाकार आहेत.