मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद!

26 Feb 2024 19:10:16

Internet


बीड :
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील इंटनेटसेवा बंद करण्यात आली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने पुन्हा एकदा आंदोलन सुरु केल्याने बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इंटरनेटसेवा बंद केली आहे.
 
याशिवाय बीड, जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यात बससेवाही बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच बीड आणि जालना जिल्ह्याची बॉर्डर सील करण्यात आली आहे. मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलन सुरु केले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस अलर्ट मोडवर आहेत.
 
काही अनुचित प्रकार घडू नये किंवा कुठलीही अफवा पसरू नये यासाठी बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सोमवारी १० तासांसाठी बस आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. तसेच जिल्हा प्रशासनाकडून कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.



Powered By Sangraha 9.0