एनटीपीसीचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प राजस्थानात

24 Feb 2024 16:14:27
NTPC Rajasthan
 
 
मुंबई: राम मंदिर सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौर उर्जा निर्मितीवर सरकारने विशेष लक्ष दिल्याचे स्पष्ट केले होते. वाढत्या ऊर्जेची मागणी व गरज लक्षात घेता सोलार रुफटॉप योजनेवर आपले लक्ष केंद्रित केले होते. यासाठी सरकारने ' प्रधानमंत्री सर्वोदय योजना ' सुरू करत १ कोटी कुटुंबांना रुफटॉप सौर उर्जा देण्याचे ठरवले आहे. या प्रयत्नांना जोड देण्यासाठी एनटीपीसी (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन) ने राजस्थानात ७० मेगावॉटचा पहिलावहिला सौर उर्जा निर्मितीसाठी कंबर कसली आहे.
 
या प्रकल्पाची उत्पादन क्षमता ३४४८ मेगावॉट इतकी असणार आहे. नुकतेच एनटीपीसीने राजस्थान येथील छत्तरगड येथे ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरु केले असून या प्रकल्पाची क्षमता १५० मेगावॉट पर्यंत असणार असल्याचे एनटीपीसीने प्रसिद्धीपत्रात म्हटले आहे.या प्रकल्पात ३७० दशलक्ष युनिटची सौर उर्जेवर वीज निर्मिती होणार असून यातुन ६०००० घरांच्या उर्जेची गरज भागणार आहे.
 
या प्रकल्पामुळे पर्यावरणाचादेखील लाभ होणार आहे ‌.या प्रकल्पामुळे ३ लाख टन कार्बन सीओटू इमिशन रोखण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे ५००० कुटुंबांना वर्षभरात पुरेसा मुबलक वीज पुरवठा करणे शक्य होणार असल्याचे जाहीरातनाम्यात म्हटले गेले आहे.
 
Powered By Sangraha 9.0