योगी सरकार भुखंड माफियांना धडा शिकवणार

23 Feb 2024 21:34:46
Yogi Adityanath on Land Mafia

नवी दिल्ली: 
सर्वसामान्य नागरिकांच्या जमिनी हडपणाऱ्या भुखंड माफियांना धडा शिकवण्याचा निश्चय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. त्यासाठी राज्यात भुखंड माफियाविरोधी पथकाची स्थापना केली आहे.जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्याच्या घटना रोखण्यासाठी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भूमाफियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना गुरुवारी भूमाफियाविरोधी कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे पथक बळकावणाऱ्यांची ओळख पटवतील. जमिनीशी संबंधित प्रकरणे नव्याने चिन्हांकित केली जातील आणि त्यांच्या गुन्हेगारी इतिहासाची पडताळणी केली जाईल. त्यानंतर अशा गुडांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

सीसीटीएनएसच्या मदतीने जमीन बळकावणे, लोकांचे पैसे हडप करणे आदी प्रकरणांची माहिती गोळा करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. ज्या प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध एकापेक्षा जास्त आरोपपत्र आहेत, त्यांना देखील चिन्हांकित केले जाईल. तहसीलदार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाशी बोलल्यानंतर ते भूमाफिया असलेल्या प्रकरणांचा आढावा घेतील आणि ते भूमाफिया पोर्टलवर अपडेट करतील. जिल्हा टास्क फोर्सचीही स्थापन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कलम ४४७/४४८ अन्वये असलेल्या गुन्ह्यांची यादी पोलिस ठाण्यांना पाठवण्यात आली आहे. याबाबत पोलीस ठाणे प्रभारी यांच्याशी चर्चा करून कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

गुलामगिरीचे आणखी चिन्ह पुसले

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ‘जामा मशीद मेट्रो स्टेशन’चे नाव 'उत्तर प्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (युपीएमआरसी) बदलले आहे. आता आग्र्याच्या भूमिगत मेट्रो स्टेशनला ‘मनकामेश्वर मेट्रो स्टेशन’ असे नाव देण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशांवरूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.

 
Powered By Sangraha 9.0