डोंबिवलीतून 1350 हून अधिक रामभक्त रामलल्लांच्या दर्शनासाठी रवाना

23 Feb 2024 13:44:33
 
 
train news
 
 
 
 
 
कल्याण : कल्याण लोकसभा मतदार संघातून सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली 1350 हून अधिक रामभक्त रामलल्लांच्या दर्शनासाठी अयोध्येत गेले आहेत.
 
अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिरात 22 जानेवारीला प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा सुवर्ण दिन येण्यासाठी गेली पाचशे हून अधिक काळ हिंदूंना संघर्ष करावा लागला होता. त्यामुळे हा सोहळा विशेष व्हावा याकरिता प्रत्येक शहरात धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केले होते. तसेच प्रत्येक रामभक्तांची अयोध्या येथे जाण्याची इच्छा होती. पण प्रत्येकाला अयोध्येत जाणे शक्य नव्हते त्यांच्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून डोंबिवली जिमखाना येथे अयोध्येतील मंदिरांची प्रतिकृती साकारण्यात आली होती. त्यामुळे जणू प्रति अयोध्याच अवतरल्याचा भास होत होता. ज्या रामभक्तांना अयोध्येला जाणे शक्य नव्हते त्यांनी या राममंदिरात जाऊन रामांचे दर्शन घेऊन भक्तीभावाने पूजा केली. प्रत्येक रामभक्तांच्या मनात एकदा तरी अयोध्येला जावे अशी इच्छा असल्याने मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आस्था विशेष ट्रेन चे आयोजन करण्यात आले होते. त्यात 1350 हून अधिक रामभक्त आणि भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते अयोध्येला रामलल्लांच्या दर्शनासाठी रवाना झाले. भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यासह विविध पदाधिकारी अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. रामभक्तांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष समीर चिटणीस, प्रज्ञेश प्रभूघाटे यासह विविध पदाधिकारी गेले होते.
 
 
 
------------------------------------------------------------
Powered By Sangraha 9.0