पंतप्रधान मोदींनी जम्मूमध्ये ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाचा केला उल्लेख म्हणाले, “हा चित्रपट कसा आहे याबद्दल”

22 Feb 2024 12:32:26
 
article 370
 
मुंबई : जम्मू-काश्मिरमधून कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. याच सत्य घटनेवर आधारित आर्टिकल ३७० हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन जम्मूच वाच्यता केली होती.
 
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
 
जम्मूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “मी ऐकलंय की या आठवड्यात ‘आर्टिकल ३७०’ वर आधारित एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट कसा आहे याबद्दल मला माहीत नाही. पण मी या चित्रपटाबद्दल नुकतंच ऐकलंय. ही चांगली गोष्ट आहे, कारण लोकांना योग्य माहिती मिळण्यास मदत होईल.” 
 

pm modi 
 
यामी गौतमने व्यक्त केला आनंद
 
“पंतप्रधान मोदींना आमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल बोलताना ऐकणं हा मोठा सन्मान आहे. माझी टीम आणि मला आशा आहे की ही अविश्वसनीय कथा पडद्यावर आणण्यात आम्ही तुमच्या अपेक्षा पूर्ण करू,” असे यामीने पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे.
 
 
 
 
यामी गौतम हिची प्रमुख भूमिके असलेल्या आर्टिकल ३७० चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य जांभळे यांनी केले असून आदित्य धर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. २३ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Powered By Sangraha 9.0