सरकारच्या अतिक्रमणविरोधी कारवाईत बेकायदेशीर मजारी जमीनदोस्त

22 Feb 2024 11:55:47
 Illegal Mazars
 
गांधीनगर : गुजरातमध्ये आतापर्यंत १०८ बेकायदेशीर मजारी जमीनदोस्त केल्या आहेत. अशी माहिती गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी दिली आहे. त्यांनी या मजारी कट रचून बांधण्यात आल्या होत्या, असा आरोप देखील केला. ते म्हणाले की, " कट रचून बांधलेली प्रत्येक इमारत पाडण्यासाठी आमचा बुलडोझर तयार आहे."
 
गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी बुधवारी, दि. २१ फेब्रुवारी २०२४ गुजरात विधानसभेत या अतिक्रमणविरोधी मोहिमेची माहिती दिली. यासोबतच त्यांनी काँग्रेस सरकारवर देखील टीका केली. ते म्हणाले की, "काँग्रेसच्या काळात अहमदाबादच्या जमालपूर येथील जैन मंदिरातून मूर्ती हटवण्यात आल्या होत्या. आता राज्याच्या कानाकोपऱ्यात दादांचा (मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल) बुलडोझर फिरत आहे, जेणेकरून कुठलेही मंदिर किंवा देवस्थान कट करून हटवले जाऊ नये. आता हा बुलडोझर कुठे जाईल हे कोणालाच माहीत नाही."
 
पुढे बोलताना ते म्हणाले की, “राज्यात आतापर्यंत १०८ मजारी पाडण्यात आल्या असून राज्यातील मालमत्ता मोकळ्या करण्यात आल्या आहेत. सोमनाथजवळील अवैध अतिक्रमणही हटवण्यात आले आहे." यावेळी त्यांनी जुनागडच्या उपरकोट किल्ल्यात बांधलेल्या बेकायदेशीर मजारी पाडण्याबाबतही माहिती दिली. हर्ष संघवी म्हणाले की, “उपरकोटमध्ये इतक्या थडग्या कुठून आल्या हे कोणालाच माहिती नाही. इतक्या लवकर इथे थडगे कसे बांधता येईल?”
 
उल्लेखनीय आहे की, मे २०२३ मध्ये राज्य सरकारने जुनागडच्या या किल्ल्यातील शेकडो बेकायदेशीर थडग्या जमीनदोस्त केल्या होत्या. या काळात येथे आणखी काही इमारती पाडण्यात आल्या. सरकारने ७४ कोटी रुपये खर्चून या किल्ल्याची डागडुजीही केली होती. हर्ष संघवी यांनी सभागृहात सांगितले की, राज्यात अतिक्रमण काढण्याची मोहीम वेगाने सुरू आहे. त्यांनी सांगितले की ही मोहीम द्वारका येथून सुरू झाली आणि आता ती सुरत, जामनगर, पोरबंदर, सूरत, पावागड आणि अहमदाबादपर्यंत पोहोचली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0