मौलानाने केला ८ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

21 Feb 2024 18:40:59
 Madarsa Maulana
 
लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये मदरशात शिकवणाऱ्या मौलानाने विद्यार्थ्यांनीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलगी अवघ्या ८ वर्षांची आहे. मौलाना आबेदीनचे मुलीच्या आईशीही अवैध संबंध असल्याचे बोलले जात आहे. पीडितेच्या आईलाही आपल्या मुलीवर झालेल्या बलात्काराची माहिती होती, असा दावा केला जात आहे. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी मौलाना आणि त्याच्या भावाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
 
या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी, दि. १९ फेब्रुवारी २०२४ गुन्हा दाखल करून मौलाना आबेदीन आणि मुलीच्या आईला अटक केली. दरम्यान, आबेदिनचा भाऊ अर्शद फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली तसेच भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना लखनऊच्या मलिहाबाद पोलीस स्टेशन परिसरात घडली. तक्रारदार हे मुलीचे वडील असून, ते या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहेत. तक्रारदार हे ओमानमध्ये काम करतात. तो एकावेळी ५ महिन्यांसाठी ओमानला जातो. यावेळी जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलीला घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या न्यू हैदरगंज भागात असलेल्या इस्लामिया शमसुल उलूम मदरसामध्ये प्रवेश मिळवून दिला होता.
 
या मदरशात मौलाना आबेदीन मुलांना धार्मिक (इस्लामिक) शिक्षण द्यायचा, असा पीडितेच्या वडिलांचा आरोप आहे. काही वेळाने मौलानाही मुलीच्या घरी येऊ लागले. काही वेळानंतर मौलाना आबेदीनने पत्नीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. काही दिवसांनी तक्रारदाराची पत्नी मौलानासोबत राहू लागली. नंतर महिलेने आपल्या मुलीला मदरसा वसतिगृहात शिफ्ट केले.
 
येथे मौलानाने या ८ वर्षाच्या मुलीवर अनेकवेळा बलात्कार केला. मुलीने हा सर्व प्रकार आईला सांगितल्यावर ती तिला मारहाण करायची. तक्रारदाराचा आरोप आहे की, त्याची पत्नी आपल्या मुलीला मौलानाकडे पाठवत असे. ब-याच दिवसांनी तक्रारदार ओमानहून परतल्यावर मुलीने त्यांना सर्व प्रकार सांगितला.
 
यानंतर पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून मौलाना आबेदीनसोबत त्याचा भाऊ अर्शदही या घृणास्पद कृत्यात सामील असल्याचा आरोप केला आहे. फिर्यादीने आपल्या पत्नीने मौलानाला बलात्कारात साथ दिल्याचा आरोपही केला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0