गोरेगाव येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयांतर्गत शेळीपालन कार्यक्रम संपन्न

21 Feb 2024 15:07:42
Goat rearing training in goregaon

मुंबई : 
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर व महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय गोरेगाव येथील शैक्षणिक पशुधन प्रक्षेत्र येथे दिनांक १० फेब्रुवारी २०२४ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील ३० पशुसखी उपस्थित होत्या.

महिलांना शेळीपालनाच्या प्रात्यक्षिक आणि व्यवसायासाठी संपूर्ण मार्गदर्शन केले आणि जास्तीत जास्त सहभाग घेऊन ज्ञान घेणे त्यासाठी महाविद्यालयातील सर्व विभागाचे तज्ञ आणि पशुधन प्रक्षेत्र विभागातील सर्व मंडळी आपल्याला सहकार्य करतील, असे अधिष्ठाता डॉ.गुळवणे यांनी सांगितले. तसेच, अहमदनगर जिल्ह्याची विकासाची परंपरा अखंडीत ठेवण्यासाठी महिलांनी जास्तीत जास्त प्रशिक्षणाचा प्रात्यक्षिकाचा फायदा करून घेऊन आपल्या गावातील इतर महिलांना या व्यवसायामध्ये मार्गदर्शन करावे, असे डॉ. धनंजय देशमुख यांनी सांगितले.

डॉ. पालमपल्ले यांनी दहा दिवसांमध्ये महिलांना जास्तीत जास्त प्रात्यक्षिके दाखवून त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्याची हमी दिली व जास्तीत जास्त महिलांनी शेळीपालनाच्या दैनंदिन व्यवस्थापनाचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा अशी सूचित केले. दरम्यान, १० दिवसीय शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दि. १० फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आले. तसेच, सदर कार्यक्रम उद्घाटनावेळी डॉ.धनंजय देशमुख, प्रकल्प समन्वयक व प्रमुख पाहुणे आणि डॉ. सरिता गुळवणे मॅडम, सहयोगी अधिष्ठाता, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ अध्यक्ष म्हणून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. डॉक्टर प्रेरणा घोरपडे डॉक्टर अरुण प्रभू मेंढे डॉक्टर संजय कदम आणि संपत गावित यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहकार्य केले 

Powered By Sangraha 9.0