विठ्ठलच्या विविध रूपातील चित्रांचे बदलापुरात प्रदर्शन

20 Feb 2024 18:18:36
Kishor Kawad Painting Exhibition

बदलापूर :  
किशोर कवाड यांच्या कुंचल्यातून रेखाटलेली विठ्ठलाच्या विविध रूपांतील चित्रांचे प्रदर्शन बदलापूरमधील आर्ट गॅलरी येथे भरवण्यात आले आहे . दि. २९ फेब्रुवारी पर्यंत हे चित्र प्रदर्शन कलारसिकांना पहाता येणार आहे.

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा असणाऱ्या, विठू माऊलीच्या अनेक , कलाकृती प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. कलाकार, चित्रकार किशोर कवाड यांच्या विठ्ठलमय प्रवासातील अनुभव त्यांनी सांगितले. 
 
विठुरायाच्या प्रत्येक चित्रामध्ये, वेगवेगळ्या भावना, हावभाव हे जिवंतपणे साकारण्यात आले आहे. त्यातच या सगळ्या चित्रांना दिलेली रंगसंगती ही सुंदर आणि विलक्षण आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन राजेंद्र घोरपडे यांनी केले आहे.

Powered By Sangraha 9.0