"भारत VS इंग्लंड सामना होऊ देणार नाही" - खलिस्तानी दहशतवादी पन्नूने दिली धमकी

20 Feb 2024 16:57:51
 pannu
 
रांची : खलिस्तानी दहशतवादी संघटना शीख फॉर जस्टिसचा म्होरक्या गुरुपतवंत सिंग पन्नूने पुन्हा एकदा भारताविरोध गरळ ओकली आहे. पन्नूने रांचीच्या जेएससीए स्टेडियमवर २३ ते २७ फेब्रुवारी दरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा कसोटी सामना उधळून लावण्याची धमकी दिली आहे. यूट्यूबवरील एका व्हिडिओच्या माध्यमातून त्याने भारतातील बंदी घातलेली संघटना सीपीआय माओवाद्यांना सामना रद्द करण्याचे आवाहन केले आहे.
 
पन्नूने युट्यूब व्हिडिओच्या माध्यामातून झारखंड आणि पंजाबमध्ये भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्याआधी अशांतता पसरवण्याचा आवाहन केले आहे. त्यासोबतच पन्नू इंग्लंडच्या संघाला धमकी सुद्धा दिली आहे. या प्रकरणी धुर्वा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मदनकुमार महतो यांच्या तक्रारीवरून दि. १९ फेब्रुवारी रोजी धुर्वा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
गुरुपतवंत सिंग पन्नूने भारतात दहशत पसरवण्याचा आणि आदिवासींच्या मनात सरकारबद्दल द्वेष आणि तिरस्कार निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी तक्रारीत करण्यात आला आहे. त्याचा व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहे. त्याचे कृत्य यूएपी कायदा, आयटी ॲक्ट अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे. या तक्रारीवरून संबंधित कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
 
गुरुपतवंत सिंग पन्नूने याआधी सुद्धा भारतविरोधी वक्तव्य केली आहेत. भारत सरकारने त्याला दहशतवादी घोषीत केलेले आहे. पन्नूकडे अमेरिका आणि कॅनडाचे नागरिकत्व आहे. तो या दोन्ही देशांमध्ये भारतविरोधी कारवाईंचे नेतृत्व करतो. त्याचे संबंध पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेशी असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0