रहस्य खवले मांजराचे

19 Feb 2024 14:59:05


pangolin day




जैवविविधतेतील एक महत्त्वाचा पण तितकाच दुर्लक्षित घटक म्हणजे खवले मांजर. भारतात खवले मांजरांविषयी अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी ‘वाईल्डलाईफ कॉन्झरवेशन ट्रस्ट-इंडिया’ने (WCT- India) देशातील पहिलाच टॅगिंग केलेल्या यशस्वी प्रयोगाबद्दल, नुकत्याच झालेल्या ‘जागतिक खवले मांजर दिना’निमित्त...


जगभरात सर्वांत जास्त शिकार, आंतरराष्ट्रीय स्तरावर चालणारा अवैध व्यापार, तस्करी असे ग्रहण लागलेला, लाजाळू आणि निशाचर असणारा, अभ्यास आणि संशोधनाच्या दृष्टिकोनातून अजूनही दुर्लक्षित असलेला एक सस्तन प्राणी म्हणजे खवले मांजर. फेब्रुवारी महिन्यातील तिसरा शनिवार हा दरवर्षी जागतिक खवले मांजर दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरात या खवले मांजराच्या एकूण आठ प्रजाती आढळत असून आशिया खंडात चार तर, आफ्रिका खंडात चार प्रजातींचा अधिवास आहे. भारतात खवले मांजराच्या चायनिज खवले मांजर (Chinese Pangolin) आणि भारतीय खवले मांजर (Indian Pangolin) अशा दोनच प्रजाती आढळतात.

फारच मोजक्या स्वरुपात उपलब्ध आहे. यामुळेच, ‘आययुसीएन’च्या यादीत लुप्तप्राय वर्गात असणार्‍या या खवले मांजरांवर अभ्यास आणि संशोधन व्हावे, या दृष्टिकोनातून ‘वाईल्डलाईफ कॉन्झरवेशन ट्रस्ट-इंडिया’ आणि मध्य प्रदेश वनविभागाने खवले मांजरांना रेडिओ टॅग लावण्याचा प्रयोग हाती घेतला. ‘बीएनपी-पॅरीबस बँके’च्या अर्थसाहाय्यातून 2019 साली सुरू झालेल्या या प्रकल्पामध्ये आजवर एकूण 11 खवले मांजरांना टॅग लावण्यात आले आहेत. यामध्ये नऊ माद्या तर दोन नर खवले मांजरांचा समावेश आहे.


pangolin tagged

खवलेधारी शरीर, सळसळती जीभ आणि धोका जाणवताच चेंडूसारखे गोलाकार करता येणारे शरीर ही त्याची वैशिष्ट्ये. मुंग्या आणि वाळवी खाण्यासाठी विकसित झालेल्या जीभेवर असलेल्या चिकट स्त्रावामुळे ते मुंग्या आणि वाळवी खाऊ शकतात. अंगावर खवले असणारा हा जगातला एकमेव सस्तन प्राणी आहे.



pangolin tagged

या प्रकल्पामध्ये खवले मांजराच्या पाठीवर शेपटीकडील भागात टॅग लावण्यात आले आहेत. यामध्ये ‘व्हीएचएस टॅग’ आणि ‘सॅटेलाईट टॅग’ असे दोन प्रकार असून या दोन्हींचे कार्य वेगवेगळे आहे. हा प्राणी जमिनीखाली बिळात राहत असल्यामुळे स्वतःसाठी बीळ खणत असताना अनेकदा यांच्या पाठीवर असलेले टॅग जास्त काळ टिकत नाहीत. त्यामुळे पुढील माहिती मिळणे कठीन होते. या टॅगची बॅटरी संपत आल्यानंतर संशोधकांना याबद्दल माहिती मिळते आणि ते त्याजागी नवीन टॅग लावतात. एकूण 11 टॅग केलेल्या या खवले मांजरांपैकी केवळ दोन खवले मांजर जंगलातली आहेत, तर बाकी सर्व तस्कर आणि शिकार्‍यांच्या तावडीतून वनविभागाने बचावकार्य केलेली खवले मांजर आहेत. विशेष म्हणजे, तसेच, टॅग आणि पुनर्वसित केलेल्या चार माद्यांनी पिल्लांना ही जन्म दिला.


pangolin tagged

अभ्यासादरम्यान असे लक्षात आले की नर खवले मांजर अधिक प्रवास करते, तर मादी खवले मांजर तुलनेने कमी प्रवास करते. या प्राण्याला स्वतःचा प्रदेश निश्चित करण्याचे वैशिष्ट्य दिले असून ते थोड्याफार अंतरावर अनेक बिळे ही करून ठेवतात. जेणेकरून, एकाच बिळात राहण्याच्या धोक्यापासून स्वतःला वाचवत हे प्राणी थोड्याफार फरकाच्या दिवसाने आपले राहते, बीळ बदलतात. या प्रकल्पाच्या क्षेत्रामध्ये संशोधकांनी कॅमेरा ट्रॅपिंग ही केले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर माहितीचे संकलन होत आहे. भारतातील या पहिल्याच आणि यशस्वी प्रकल्पाचा, यातून गोळा झालेल्या माहितीचा संवर्धनाच्या कामात नक्कीच उपयोग होईल यात शंका नाही.


Powered By Sangraha 9.0