रांचीमध्ये विसर्जन मिरवणुकीला गालबोट; दगडफेकीत अनेकजण जखमी

17 Feb 2024 14:06:21
stone-pelting-violence-on-saraswati-puja-bhagalpur

नवी दिल्ली :   
बिहार तसेच रांचीमध्ये सरस्वती पूजेनंतर विसर्जनाच्या दिवशी दगडफेकीची घटना घडल्याचे समोर आले आहे. देवी सरस्वतीची पूजा झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीस सुरूवात झाली. त्यानंतर मिरवणूक मुस्लिम वस्तीत जाताच दंगलसदृश्य परिस्थिती उद्भवल्याची परिस्थिती निर्माण झाली होती.

दरम्यान, बिहारमधील दरभंगा, भागलपूर व झारखंडच्या रांचीमध्ये मिरवणुकीच्यावेळी या दगडफेकीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या हिंसाचारावेळी काही ठिकाणी देवीच्या मूर्तीचीही मोडतोड झाली असून डझनहून अधिक लोक जखमीही झाले आहेत. त्याचबरोबर, विसर्जन मिरवणूक भागलपूर येथे पोहोचताच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. या ठिकाणी मुस्लिम वस्तीत जाताच जमावाकडून दगडफेक करण्यास सुरूवात झाली. त्यामुळे एकंदरीत परिसरातील वातावरण बिघडल्याचे दिसून आले.

रांचीमधील नगडी येथील रस्तावर सर्वत्र दगडं पाहायला मिळाली. या सर्वप्रकारानंतर स्थानिक पोलिस प्रशासनाकडून जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. दगडफेकीमुळे पोलीस यंत्रणा सतर्क असून सदर घटनेचा तपास यंत्रणेकडून सुरू आहे.

सरस्वती पूजेनंतर विसर्जनाच्या दिवशी बिहारमधील दरभंगा, भागलपूर आणि झारखंडच्या रांचीमध्ये मिरवणुकीदरम्यान दगडफेकीच्या घटना उघडकीस आल्या. यादरम्यान काही ठिकाणी देवीच्या मूर्तीचीही मोडतोड झाली असून डझनहून अधिक लोक जखमीही झाले आहेत. हा गोंधळ इतका वाढला की प्रशासनाला कलम १४४ लागू करून परिसरात अतिरिक्त पोलिस तैनात करावे लागले.
 
Powered By Sangraha 9.0