“बस्तरमध्ये तिरंगा फडकावणं हा गुन्हा…”, ‘बस्तर’चा आणखी एक हृदयद्रावक टीझर प्रदर्शित

14 Feb 2024 18:09:46

bastar
 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या वास्तववादी चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री अदा शर्मा पुन्हा एकदा वास्तववादी चित्रपटाचा भाग होणार आहे ज्याचे नाव आहे ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा एक टीझर प्रदर्शित झाला होता. आता आणखी एक ह्रदयद्रावक टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
 
‘बस्तर’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा विपुल अमृतलाल शाह, सुदीप्तो सेन व अदा शर्मा हे तिघे एकत्र आले आहेत. या चित्रपटात अदा शर्मा ही मुख्य भूमिकेत असून ती आयपीएस अधिकारी नीरजा माधवन यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. बस्चरच्या पहिल्या टीझरमध्ये पाकिस्ताबरोबर युद्धात शहिद झालेले आपले जवान आणि आपल्याच देशात नक्षलवादी लोकांनी केलेली आपल्या जवानांची हत्या अन् जेएनयुसारख्या विद्यापीठात त्या कृतीची झालेले सेलिब्रेशन अशा अंतर्मुख करणाऱ्या गोष्टींबद्दल अदा शर्मा भाष्य करताना दिसली.
 
तर दुसऱ्या टीझरमध्ये एक पीडित महिला तिची व्यथा मांडताना दिसत आहे. रत्ना कश्यप ही महिला तिच्यावर नक्षलवादी लोकांकडून झालेल्या अन्यायाबद्दल आपल्याला सांगताना या व्हिडिओत दिसत आहे. इतकंच नव्हे तर बस्तरमध्ये तिरंगा फडकावणं हा गुन्हा आहे आणि तसं केल्यास फार वाईट शिक्षा आहे ती म्हणजे मृत्यू असं देखील ती महिला बोलताना दिसते. त्यामुळे एका आईच्या तोंडून तिची ही हृदयद्रावक कहाणी या टीझरमधून आपल्यासमोर आलेली आहे. आता या चित्रपटातून आणखी किती वेदनादायक गोष्टी पाहायला मिळणार हे प्रदर्शनानंतरच समजेल. ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’चे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनीच केले आहे आणि विपुल शाह यांनी त्याची निर्मिती केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0