'वन नेशन, वन इलेक्शन'च्याबाबतीत मोठी बातमी!

13 Feb 2024 15:21:29
 One Nation One Election
 
नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली वन नेशन, वन इलेक्शन या विषयावर स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या सदस्यांची दि. १२ जानेवारी सोमवारी राज्य निवडणूक आयुक्तांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्य निवडणूक आयुक्तांचे एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर मते जाणून घेण्यासाठी ही बैठक पार पडली.
 
सप्टेंबर महिन्यामध्ये लोकसभा, विधानसभा, नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीने स्थापन करण्यात आली होती. समितीने आपले काम सुरु केले आहे. यापूर्वी दि. २७ जानेवारी २०२४ रोजी माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी भारताचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती यूयू ललित, मद्रास उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांच्याशी चर्चा केली होती.
 
 
Powered By Sangraha 9.0