मिशनरी शाळेत रामायण-महाभारताचा अपमान; हिंदू मुलींना बांगड्या घालण्यापासून रोखलं

13 Feb 2024 12:02:49
 school
 
बंगळुरु : कर्नाटकातील मंगळुरू येथील ख्रिश्चन मिशनरी शाळेत जाणाऱ्या हिंदू मुलांवर सर्व प्रकारची बंधने लादण्यात आली होती. असा आरोप करण्यात आला आहे. त्यासोबतच, एका शिक्षकाने पंतप्रधान मोदींविरोधातील अपप्रचाराच्या गोष्टी सातवीच्या विद्यार्थ्यांना सांगितल्या. या शिक्षकाने विपर्यास करून 'गोध्रा घटना' आणि 'बिल्कीस बानो प्रकरण' यासारखे संवेदनशील मुद्दे मुलांसमोर मांडले, त्यामुळे मुलांमध्ये पंतप्रधान मोदींविरोधात द्वेष भरला.
 
एवढेच नाही तर रामायण आणि महाभारताला काल्पनिक म्हणत राम आणि अयोध्या शहरालाही शिक्षकाने नाकारले. हे प्रकरण मंगळुरू येथील सेंट गेरोसा इंग्लिश एचआर प्राथमिक शाळेचे आहे. दि. ८ फेब्रुवारी सातवीच्या वर्गातील मुलांना शिकवत असताना शिक्षकाने अशी टिप्पणी केल्याचा आरोप आहे. मुलाच्या पालकांनी शिक्षकावर गंभीर आरोप केले आणि मुलांचे ब्रेनवॉश कसे केले जात असल्याचे सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून हे सुरू आहे. मागच्या वर्षीही याच सगळ्या गोष्टी मुलांना सांगितल्या होत्या.
 
आरोपी शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. शिक्षकाला नोकरीवरून काढून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी शाळा व्यवस्थापनाकडे केली आहे. सेंट जेरोसा इंग्लिश एचआर प्रायमरी स्कूलच्या प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. शिक्षकावरील आरोप खरे ठरल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, चौकशीअंती शिक्षकाला बडतर्फ करण्यात आले.
 
 
Powered By Sangraha 9.0