ठाण्यात माघी गणेशोत्सवात भक्ती आणि संस्कृतीचा संगम

13 Feb 2024 19:50:57
Maghi Ganeshotsav in Thane City

ठाणे : 
ऐतिहासिक, सांस्कृतिक ठाणे शहराच्या लौकिकात भर घालण्याच्या व्यापक उद्देशाने भाजपच्या संदीप लेले यांनी ठाणे महोत्सव माघी जयंती गणेशोत्सव आयोजित केला आहे. ठाण्यातील पाचपाखाडी परीसरातील कचराळी तलावानजीक कोकणातील प्राचीन मंदिराच्या भव्य देखाव्यात मंगळवारी बाप्पा विराजमान झाले.पेण येथील सुबक, देखणी सुमारे सहा फुटाची श्रीगणेशाची मूर्ती हे वैशिष्ट्य आहे.

डोळ्यांचे पारणे फेडणारी रोषणाई आणि अन्य सजावट यामुळे हा महोत्सव ठाण्यात चर्चेचा विषय ठरला आहे. पहिल्या दिवशी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी व मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या महोत्सवाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, केंद्रीय मंत्री यांच्यासह सर्व पक्षीय राजकीय नेते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, कलाकार भेट देणार आहेत.दरम्यान, ठाण्यात सर्वत्र माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा होत असुन भक्ती आणि संस्कृतीचा संगम पहावयास मिळत आहे.
Powered By Sangraha 9.0