गाझा युद्ध, रेड सी हल्ल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला धोका - 'जागतिक इशारा '

13 Feb 2024 14:54:56

Georgia  
 
 
 
गाझा युद्ध, रेड सी हल्ल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला धोका - 'जागतिक इशारा '
 

इंटरनॅशनल मॉनेटरी फंड व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टीटालिना जॉर्जिव्हा यांची स्पष्टोक्ती
 

मुंबई: आयएमएफ ( इंटरनॅशनल मॉनेटरी फंड ) व वर्ल्ड बँक यांनी गाझा पट्टीतील इस्त्रायल हमास युद्ध, व रेड सी जहाज हल्ला या प्रकरणामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला धोक्याचा इशारा दिला आहे. यापूर्वी हमास युद्धाचा मध्य पूर्व, उत्तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले होते अशी स्पष्टोक्ती इंटरनॅशनल मॉनेटरी फंडच्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टीटालिना जॉर्जिव्हा यांनी दिली आहे.
 
 
जगातील नामवंत नेते व आर्थिक विषयक तज्ज्ञ वर्ल्ड गव्हमेंट समिट या कार्यक्रमासाठी जमले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थव्यवस्थेबाबत भाष्य करताना जॉर्जिव्हा यांनी हे उद्गार काढले. मागील महिन्यात युएस कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट या कार्यक्रमात देखील सुएझ कनालमधील वाढलेली व्यवसायिक वाहतूक हा ४० टक्क्यांहून झाल्याचे सुतोवाच करण्यात आले होते. युएन रिपोर्ट नुसार व्यवसायिक रहदारी कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
 
 
यावेळी बोलतांना, त्या म्हणाल्या, ' मागील वर्षाप्रमाणे या वर्षाच्या मध्यंतरी व्याजदर वाढत महागाई निर्देशांक वाढण्याची शक्यता आहे. सध्या रेड सी, गाझा विवाद ही अर्थव्यवस्थेपुढील प्रमुख आव्हाने आहेत.
 
Powered By Sangraha 9.0