इच्छा तिथे मार्ग! फिजिक्सवालाकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदत

13 Feb 2024 12:34:29

Alakh Pandey  
 
इच्छा तिथे मार्ग! फिजिक्सवालाकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदत
 

५१००० विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ केली
 

मुंबई: शिकण्याची इच्छा व आशा असल्यास मार्ग सापडतोच. तसंच काहीसे ज्ञानदान फिजिकल वाला कंपनीच्या संस्थापकांकडून केले गेले. फिजिक्सवालाचे संस्थापक अलख पांडे यांनी ५१००० सामाजिक वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची फी माफ केली आहे ‌. एनईइटी, जेईई, वाणिज्य, कला , शाखा , नववी ते बारावी अशा विविध विभागांतील विद्याथ्र्यांची शिकवण माफ केली असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. राईट टू एज्युकेशन प्रोग्राम या मुलभूत विद्यार्थ्यांच्या हक्काना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम केले असल्याचे कंपनीने आपल्या जाहीरातनाम्यात स्पष्ट केले आहे.
 
आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये ५१००० विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शैक्षणिक माफ करत आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना आधार देण्याचे संकल्प अलख पांडे यांनी केला होता. १७ कोटी रुपयांचा खर्च कंपनी उचलणार असल्याची माहिती कंपनीने दिली.
Powered By Sangraha 9.0