अशोक चव्हाणांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले,"मोदींच्या..."

13 Feb 2024 12:53:34

Chavan


मुंबई :
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपलब्धी मान्य करायलाच हव्यात. केवळ विरोधासाठी विरोध करायचा नसतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे. सोमवारी चव्हाणांनी काँग्रेस सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर लोकमत वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
 
"पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात देशात मोठ्या प्रमाणात प्रकल्प उभे राहिलेत. त्यांनी अनेक लोकाभिमुख योजना आणल्या. त्यामुळे आपण मोदींची उपलब्धी मान्य करायलाच हवी. केवळ विरोधासाठी विरोध करायचा नसतो," असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
 
दुसरीकडे, मंगळवारी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाणांसारख्या बड्या नेत्याचा राजीनामा हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.



Powered By Sangraha 9.0