स्पाईसजेट करणार १००० कर्मचाऱ्यांची कपात

12 Feb 2024 16:08:53

Spicejet  
 
 
स्पाईसजेट करणार १००० कर्मचाऱ्यांची कपात
 

कंपनीकडून कारण स्पष्ट झाले नसले तरी अतिरिक्त मनुष्यबळ कमी करत असल्याची चर्चा सुरू
 

मुंबई: स्पाईसजेटच्या काही कर्मचाऱ्यांसाठी अवकळा आली आहे. स्पाईसजेट कंपनीकडून अतिरिक्त १००० कर्मचाऱ्यांना नारळ देणार असल्याची बातमी प्रसारमाध्यमांनी दिली. कंपनीच्या एकूण वाढीव खर्चात कपात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा कयास कंपनीने केला आहे. एअरक्राफ्ट वरील वाढीव खर्च, कमी करण्यात आलेल्या विमानफेरी यामुळे ही कारवाई करत असल्याची माहिती स्पाईसजेटच्या अधिकारीवर्गाने दिलं आहे.
 
आर्थिक संकटात सापडलेल्या स्पाईसजेट कंपनीच्या अडचणीत कायदेविषयक अडचणीत, इतर तांत्रिकदृष्ट्या अडचणी यामुळे कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. सुत्रांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार याबाबत अंतिम निर्णय या आठवड्यात घेतला जाणार आहे.
 
सध्या स्पाईसजेटकडे ९००० कर्मचारी असून यातील प्रामुख्याने १५ टक्के कर्मचारी कपात करण्याचा कंपनीचा विचार असल्याचे सांगितले जाते. यानुसार १३५० कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता असून या कारवाईमुळे कंपनीला १०० कोटी रुपयांची बचत शक्य होणार आहे. एअरलाईन्सने नुकतेच १००० कोटींचे इर्मजनसी क्रेडिट लाईन गारंटी स्कीम अंतर्गत घेतले होते. याशिवाय अधिकचे ५०० कोटी रूपये कंपनी प्रमुख अजय सिंग यांनी गुंतवण्याचे ठरवले होते. काही थकबाकी प्रलंबित असल्याने कंपनी आर्थिक अडचणीत सापडली आहे.
 
एकूण देशांतर्गत विमान प्रवासातील ५.५ टक्के मार्केट शेअर स्पाईसजेटचे आहेत.
 
Powered By Sangraha 9.0