भारताच्या शक्तीपुढे कतार झुकले! ८ नौदल अधिकाऱ्यांची सुटका

12 Feb 2024 12:00:26
qatar india
 
नवी दिल्ली : कतारमध्ये मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आठ भारतीय नागरीकांची सुटका करण्यात आली आहे. आठ पैकी सात जण सोमवारी सकाळी मायदेशी परतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांशिवाय आम्हाला परत आणणे अशक्य होते अस नवी दिल्ली येथे पोहोचलेल्या नागरिकांनी म्हटल आहे. हेरगिरीच्या आरोपाखाली कतारने या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

 
दोहा येथे असलेल्या अल दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीमध्ये भारताचे आठ माजी नौसैनिक काम करत होते. या आठ जणांना कतारने ऑगस्ट २०२२ मध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या आठ जणांवर कतार मधील पाणबुडी प्रक्लपाचा हेरगीरी केल्याचे आरोप लावण्यात आले होते. साधारण एक वर्षभर कतार च्या तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतर त्यांना ऑक्टोबरमध्ये कतारमधील कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.
 
दुबई येथे झालेल्या कॉप २८ संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्या कतार मधील भारतीय नागरीकांबद्दल बातचीत झाल्याच सांगितल जात. १ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, मी कतारमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाबद्दल अमीरांशी बोललो आहे. या काळात नौदल कर्मचाऱ्यांचा प्रश्नही उपस्थित झाला असेल, असे मानले जात आहे.
 
 
 
कतार मधील भारतीय नागरींकांची सुटका हा भारतासाठी मोठा कुटनितीक विजय मानला जात आहे. आठ पैकी सात जण नुकतेच भारतात परतले आहेत. भारतात परतताच नागरीकांनी भारत माता की जय च्या घोषणा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांमुळेच आम्ही परत येवु शकलो अस मत या नागरीकांनी व्यक्त केलं आहे.

Powered By Sangraha 9.0