स्वतःचे प्रश्न सोडवण्यास सक्षम असा समाज घडवायचा आहे!

12 Feb 2024 15:05:52

Dr. Mohanji Bhagwat
(Mohanji Bhagwat on Saksham Samaj)

भोपाळ :
"भविष्यात समाजाला राष्ट्रीय दिशा द्यायची असेल तर आपल्या कार्यकर्त्यांना स्वतःचा विकास करावा लागेल. आज संघाकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे. समाजजीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरे संघाकडून लोकांना हवी आहेत. स्वतःचे प्रश्न सोडवण्यास सक्षम असा समाज घडवायचा आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. मुरैना येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांत कार्यकर्ता सम्मेलनाचा नुकताच समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, "जगात एक नवा इतिहास घडताना आपण पाहत आहोत. भारतही आपली दिशा बदलत आहे. गेल्या अनेक वर्षांत अनेक महान व्यक्तींनी केलेल्या प्रयत्नांचे परिणाम आज दिसून येत आहेत. नजीकच्या भविष्यात आपण सर्वजण भारताला जागतिक नेता म्हणून पाहणार आहोत, त्यासाठी आपल्यालाही स्वत:ला तयार करावे लागेल."
संघ शताब्दी वर्षाबाबत बोलताना ते म्हणाले, "२०२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु अद्याप आपले उद्दिष्ट अजून साध्य झालेले नाही. आता खरे काम करण्याची वेळ आली आहे. समाजात संघाशिवाय काही सज्जनशक्ती रचनात्मक आणि सृजनात्मक पद्धतीने काम करत आहेत. या सज्जनशक्तीची मदत घेऊन त्यांनाही आपण सहकार्य केले पाहिजे."

Powered By Sangraha 9.0