गडकरींचा षटकार ! पुढील ५ वर्षात ' या ' क्षेत्रात भारत नंबर वन होणार

12 Feb 2024 14:29:23

Nitin Gadkari PHOTO  
 
 
गडकरींचा षटकार ! पुढील ५ वर्षात ' या ' क्षेत्रात भारत नंबर वन होणार
 

ऑटोमोबाईल क्षेत्रात भारत नंबर १ होण्याची गडकरींची स्पष्टोक्ती
 

मुंबई: २०२९ पर्यंत भारत क्रमांक १ चे ऑटोमोबाईल केंद्र बनेल व जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. सुलभ सोयीसुविधा, जागतिक दर्जाचे रोडचे जाळे, पर्यायी इंधन, लॉजिस्टिकस किंमतीत होणारी कपात करणे ही सरकारची प्रमुख उद्दिष्ट आहेत असे गडकरींनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
 
 
याशिवाय देशातील मुलभूत सुविधा, सगळ्याच क्षेत्रातील पायाभूत सुविधा, पाणी, वीज, वाहतूक, कम्युनिकेशन यात आमूलाग्र बदल करायला लागेल. या बदलांशिवाय शेतीतील परिवर्तन शक्य नसल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले.
 
 
ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रगतीबाबत बोलताना गडकरी म्हणाले, ' या क्षेत्रातील महत्वाचे सगळी उत्पादन केंद्र भारतात आहेत. सगळ्याच प्रकारच्या ऑटोमोबाईल उत्पादनामध्ये भारत अग्रेसर आहे. नजिकच्या काळात हे ऑटोमोबाईल क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी चालना देईल. व आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होऊन भारत येणाऱ्या ५ वर्षात जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास वाटतो.' याशिवाय २०१४ साली मोदी सरकार स्थापन झाल्यापासून पायाभूत सुविधांवर सरकारने नेहमीच भर दिला असल्याचे गडकरी यांनी आवर्जून सांगितले.
 
   
Powered By Sangraha 9.0