फिनटेक विश्वात खळबळ पेटीएम पेमेंट बँकेच्या स्वतंत्र संचालकांचा राजीनामा!

12 Feb 2024 14:59:14

Manju Agarwal   
 
 
फिनटेक विश्वात खळबळ पेटीएम पेमेंट बँकेच्या स्वतंत्र संचालकांचा राजीनामा!
 
 
मंजू अग्रवाल यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याचे स्पष्ट 
 

मुंबई: भारतातील आघाडीची फिनटेक पेमेंट बँक पेटीएमच्या स्वतंत्र संचालकाने आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे प्रसारमाध्यमांनी स्पष्ट केले आहे. कंपनीतर्फे नोंदणीतील माहितीनुसार मंजू अग्रवाल यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीकडूनही या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कथित पेटीएम गैरव्यवहारामुळे उद्योग विश्वात खळबळ माजली होती. आरबीआय, सीबीआय, ईडी ससेमिरा चालू असल्याने गुंतवणूकदार व ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
 
या स्थितीत कंपनीकडून सीईओ विजय शेखर शर्मा यांनी आरबीआय व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली होती. परंतु आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकेवर निर्बंध लागू करण्याची तारीख पुढे ढकलण्यास नकार दिला होता. जानेवारी महिन्यात पेटीएम पेमेंट बँकेवरील बहुतांश व्यवहारावर आरबीआयकडून निर्बंध घालण्यात आले होते.
 
आरबीआयच्या निवेदनातून म्हटल्याप्रमाणे, पेटीएम पेमेंट बँकेकडून मार्गदर्शक तत्वांचे पालन झाले नसल्याचे व अनेकदा आदेशांकडे दुर्लक्ष केले असल्याचे स्पष्ट केले होते. तरीदेखील मंजू अग्रवाल यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याचे स्पष्ट होत आहे.
 
Powered By Sangraha 9.0