मागासवर्गीयांना स्टार्टअपसाठी शासनाच्या वतीने रेडकार्पेट!

11 Feb 2024 17:00:29
Software Technology Park of India

मुंबई :
राज्यातील अनुसूचित जाती घटकांतील युवक-युवती तसेच नव उद्योजकांसाठी महत्त्वाचा निर्णय शासनाच्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाने घेतला आहे. दि. १० फेब्रुवारी रोजी नागपूर येथे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडियाच्या सेंटरचे उद्घाटन संपन्न झाले. या उद्घाटनावेळी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया यांच्यात नागपूर सेंटर यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला.

दरम्यान, सदर करारानुसार येथील सेंटर मधील ५० जागा ह्या अनुसूचित जातीचा युवक युतीसाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून यामुळे मागासवर्गीय समाजातील नव उद्योजकांना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादितच्या वतीने नवीन व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. राज्यात प्रथमच सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी क्षेत्रात शासन स्तरावरुन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादितच्या माध्यमातून पाउल पडले आहे.

सदर सेंटरचे उद्घाटन रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी इलेक्ट्रॉनिकी व सुचना प्रोद्योगिकी मंत्रालय, भारत सरकार चे सहसचिव संकेत भोंडवे, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमोल शिंदे, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया पुण्याचे संचालक, डॉ.संजयकुमार गुप्ता, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया पुण्याचे महासंचालक अरविंद कुमार, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई चे महाव्यवस्थापक प्रशांत गेडाम, व जितेंद्र देवकात आदी मान्यवर उपस्थितीत होते.

Powered By Sangraha 9.0