पत्रकार सागरिका घोष यांना 'ममतां'च्या पक्षाकडून राज्यसभेचे तिकिट!

11 Feb 2024 16:42:54
 Sagarika ghose
 
कोलकाता : ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या पाच रिक्त जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी चार जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. टीएमसीने रविवारी पत्रकार सागरिका घोष आणि पक्षाच्या नेत्या सुष्मिता देव यांच्यासह चार नावांची घोषणा केली.
 
टीएमसीने 'एक्स' वर पोस्ट करून उमेदवारांची नावे जाहीर केली. टीएमसीच्या मते, आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी आम्हाला सागरिका घोष, सुष्मिता देव, नदीमुल हक आणि ममता बाला ठाकूर यांच्या नावांची घोषणा करताना खूप आनंद होत आहे. टीएमसीच्या या चार उमेदवारांपेकी सर्वात आश्चर्यकारक नाव सागरिका घोष यांचे आहे. सागरिका घोष या पत्रकार आणि लेखक आहेत. त्यासोबतच त्या पत्रकार आणि अँकर राजदिप सरदेसाई यांच्या पत्नी आहेत. याआधी त्या राजकारणात सक्रीय नव्हत्या.
 
 
Powered By Sangraha 9.0