"राहुल गांधी 'राष्ट्र' आणि 'रामा'शी तडजोड करायची नसते"

11 Feb 2024 12:32:42
 GANDHI
 
नवी दिल्ली : काँग्रेसमधील अंतर्गत कलह आणि पक्षाने राम मंदिराचे निमंत्रण नाकारल्याच्या विरोधात वक्तव्य करणारे आचार्य प्रमोद कृष्णम यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. आचार्य यांच्यावर पक्षविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आचार्य प्रमोद यांनी या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
 
पक्षातून हकालपट्टी होताच, आचार्य यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले. प्रमोद कृष्णम यांनी राहुल गांधींना त्यांच्या एक्स हँडलवर टॅग केले आणि म्हटले की, राम आणि राष्ट्राशी तडजोड होऊ शकत नाही. दि. १० फेब्रुवारी २०२४ रविवारी काँग्रेसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनुशासनहीनतेच्या तक्रारी आणि पक्षाविरोधात वारंवार वक्तव्य केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
 
प्रमोद कृष्णम यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्याच्या उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रस्तावाला काँग्रेस अध्यक्षांनी तत्काळ प्रभावाने मंजुरी दिली आहे. नुकतेच आचार्य प्रमोद कृष्णम यांनी राम मंदिराच्या 'प्राण प्रतिष्ठा' कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारल्याबद्दल सोनिया गांधी आणि खरगे यांच्यावर हल्लाबोल केला होता.
 
 
Powered By Sangraha 9.0