"संजय राऊतांची मानसिक स्थिती खालावली!"

11 Feb 2024 16:24:14

Sanjay Raut


मुंबई :
संजय राऊतांची मानसिक स्थिती खालावली आहे. माझ्यावर एकही अपहरणाचा गुन्हा नाही. त्यांनी केलेले सगळे आरोप खोटे आहेत, असे वक्तव्य लालसिंग पुरोहित यांनी केले आहे. 'टीव्ही ९ मराठी' या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना ते बोलत होते. उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लालसिंह पुरोहित यांचा एक फोटो शेअऱ केला. यात त्यांनी पुरोहितांना खंडणी, अपहरण अशा सध्या किरकोळ ठरवल्या गेलेल्या गुन्हातील आरोपी असल्याचे म्हटले होते.
 
यावरुन आता लालसिंह पुरोहित यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, "संजय राऊतांची मानसिक स्थिती खालावली आहे असं मला वाटतं. माझ्यावर एकही अपहरणाचा गुन्हा नाही. त्यांनी केलेले सगळे आरोप खोटे आहेत. माझ्यावर जे आरोप झाले आहेत त्यावेळी मी उबाठा गटात शाखाप्रमुख होतो. त्यावेळी माझे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते. मी शाखाप्रमुख असताना अनेक मोठमोठे कार्यक्रम घेतले. तरीही त्यावेळी मला मदत करायला एकही नेता आला नाही," असेही ते म्हणाले.



Powered By Sangraha 9.0