"आम्ही १० लाख लोकांना मंगळावर पाठवू" - इलॉन मॅस्क यांचा दावा

11 Feb 2024 18:54:26
 elon musk
 
मुंबई : "आम्ही एक योजना तयार करत आहोत. ज्याद्वारे १० लाख लोकांना पृथ्वीवरून मंगळावर नेले जाईल. असा दिवस येईल जेव्हा मंगळावर जाणे म्हणजे देशाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात विमानाने जाण्यासारखे असेल." असे वक्तव्य अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती एलोन मस्क यांनी केले आहे. त्यांनी यावेळी अनेक मोठे दावे केले.
 
स्पेसएक्सचे संस्थापक एलोन मस्क यांनी रविवारी एक्स वरील एका पोस्टला उत्तर देताना सांगितले की मानव पृथ्वीवरुन दुसऱ्या ग्रहावर प्रवास करेल. एका इंटरनेट वापरकर्त्याने लाल ग्रहावर जाण्यासाठी स्टारशिप लाँच करण्याबद्दल विचारले असता, मस्क म्हणाले की स्टारशिप पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीत चंद्रावर पोहोचू शकेल. स्टारशिप हे सर्वात मोठे रॉकेट आहे आणि ते आपल्याला मंगळावर घेऊन जाईल. मंगळावर जीवसृष्टी शक्य करण्यासाठी अजून खूप काम करायचे आहे.
 
याआधी जानेवारीमध्ये एक्सचे मालक एलोन मस्क यांनी सांगितले होते की, येत्या आठ वर्षांत मानवाला चंद्रावर पाठवले जाऊ शकते. आजपासून आठ वर्षांनंतर आपण मंगळावर उतरू आणि चंद्रावरही लोकांना पाठवू. मानवजातीने मंगळावर चंद्रावर आधारित शहरे स्थापन केली पाहिजे आणि तेथून पलीकडच्या ताऱ्यांचा प्रवास आपण करु शकतो.
 
यासोबतच त्यांनी चंद्रावर कायमस्वरुपी मानवी वस्तूसाठी सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे असे वक्तव्य केले. ते म्हणाले की, "चंद्रावर मानवी वस्तीसह आपला कायमस्वरूपी तळ असायला हवा आणि तिथून मंगळावर लोकांना पाठवले पाहिजे"
 
 
Powered By Sangraha 9.0