लव्ह जिहाद : लग्नाचे खोटे आश्वासन देऊन पीडितेला फसवणाऱ्या इरफानला अटक!

10 Feb 2024 16:44:31
love jihad news

नवी दिल्ली :
उत्तराखंडमध्ये लव्ह जिहादच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. प्रकरण पिथौरागढच्या धारचुलाचे आहे. येथे दोन कट्टरपंथी तरुणाने लग्नाच्या नावाखाली दोन हिंदू अल्पवयीन बहिणींना फूस लावून त्यांच्यासोबत पळ काढला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन बहिणींना उत्तर प्रदेशातील बरेली येथून ताब्यात घेतले आहे.

पिथौरागढचे पोलीस अधीक्षक लोकेश्वर सिंह यांनी दि. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी सांगितले की, दोन्ही मुलींची बरेली येथून सुटका करण्यात आली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३६३ आणि ३७६ आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिस सातत्याने छापे टाकत आहेत.एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील मुख्य आरोपी मोहम्मद इरफान हा धारचुला शहरातील एका नाईच्या दुकानात काम करत होता. त्याने कसातरी दोन्ही अल्पवयीन मुलींच्या संपर्कात येऊन त्यांना आपल्या जाळ्यात अडकवले. यानंतर तो त्या मुलींना फूस लावून उत्तर प्रदेशातील बरेली येथे घेऊन गेला.

पोलिसांनी सांगितले की, चौकशीदरम्यान इरफानने या मुलींना कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे नेण्याचा आपला हेतू असल्याचे उघड केले. या घटनेनंतर स्थानिक लोक आणि हिंदू संघटनांनी शहरात निदर्शने सुरू केली. स्थानिक लोकांनी या घटनेला लव्ह जिहादचे प्रकरण म्हटले आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुरू केली.ही घटना दि. १ फेब्रुवारी २०२४ रोजी घडली. शहरातील तणाव पाहून पोलिसांनी मुलींना ताब्यात घेतले आणि ४ फेब्रुवारीला इरफानला अटकही केली. या घटनेनंतर एसपी लोकेश्वर सिंह यांनी स्थानिक पोलिसांना पिथौरागढमध्ये राहणाऱ्या सर्व बाहेरील लोकांची पडताळणी पुन्हा सुरू करण्यास सांगण्याचा निर्णय घेतला आहे.

या घटनेच्या निषेधार्थ धारचुला व्यापारी संघटनेचे म्हणणे आहे की, पोलिस पडताळणी होईपर्यंत शहरात व्यवसाय करणाऱ्या सर्व बाहेरील व्यापाऱ्यांची नोंदणी केली जाणार नाही. धारचुला ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष भूपेंद्र सिंह थापा म्हणाले, “आम्ही धारचुला या व्यापारी संघटनेत नोंदणी केलेल्या सर्व ६३० व्यापाऱ्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. “पोलिसांच्या पडताळणीनंतरच व्यापाऱ्यांची नवीन नोंदणी केली जाईल.”

भूपेंद्रसिंह थापा म्हणाले की, पोलिस पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर धारचुलामध्ये सन २००० पासून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचीच नोंदणी केली जाईल. “कोणत्याही प्रकल्पासाठी मजुरांची नियुक्ती करणे आवश्यक असल्यास, संबंधित कंत्राटदारांना त्यांच्या स्वत: च्या जबाबदारीवर बाहेरून मजुरांना कामावर ठेवण्याची तात्पुरती परवानगी दिली जाईल,” ते म्हणाले.उत्तराखंड हे लव्ह जिहादचे नवे टार्गेट पॉईंट बनले आहे. याच शहरात २०१९ मध्ये एका मुलीवर बलात्कार करून तिचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. त्यावेळी स्थानिक लोकांनी याप्रकरणी एका मुस्लिम तरुणावर आरोप केला होता. हिंदू संघटनांनीही या प्रकरणाला लव्ह जिहाद म्हणत निषेध केला होता आणि कठोर कारवाईची मागणी केली होती.


Powered By Sangraha 9.0