पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले पं. लक्ष्मण भट्ट तैलंग यांचं निधन

10 Feb 2024 18:24:37
 
pt bhatt
 
मुंबई : पं. लक्ष्मण भट्ट तैलंग यांचं जयपूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्याच महिन्यात त्यांना पद्मश्री पुरस्कर जाहीर झाला होता. धृपद गायनाची कला मोठ्या उंचीवर नेणारे लक्ष्मण भट्ट तैलंग यांचं दि. १० फेब्रुवारी रोजी शनिवारी सकाळी देहावसान झालं. मृत्यूसमयी ते ९५ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते न्यूमोनिया आणि इतर काही व्याधींनी आजारी होते. या आजारांमुळे त्यांना जयपूरच्या दुर्लभजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान शनिवारी सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तैलंग यांच्या निधनाने राजस्थानच्या आणि पर्ययने भारताच्या सांस्कृतिक परंपरेचं मोठं नुकसान झालं असल्याची भावना व्यक्त होत आहे. लक्ष्मण भट्ट तैलंग यांच्या जाण्याने संगीतप्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे.
 
त्यांच्या कुटुंबात त्यांच्या मागे त्यांचा मुलगा रविशंकर, मुलगी शोभा, उषा, निशा, मधु, पूनम आणि आरती आहेत. आपल्या सर्व मुलांना लक्ष्मण भट्ट तैलंग यांनी आपली धृपद संगीत विद्येत पारंगत केलं आहे. त्यांची मुलगी प्रोफेसर मधु भट्ट तैलंग या राजस्थानच्या पहिल्या प्रसिद्ध महिला धृपद गायिका आहे.
Powered By Sangraha 9.0