“…म्हणून स्वत:ला ‘राजदत्त’ दिले नाव”, पद्मभूषण राजदत्त यांनी सांगितले नावामागचे रहस्य

10 Feb 2024 11:31:36
rajdutt 
 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतल अमुल्य योगदानाबद्दल केंद्र सरकारकडून दिला जाणारा पद्मभूषण पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना जाहिर करण्यात आला. याच निमित्ताने दै. मुंबई तरुण भारतने पद्मभूषण राजदत्त यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या गुरुंचे अर्थात ज्येष्ठ दिग्दर्शक राजा परांजपे यांचे कायमस्वरुपी स्मरण राहावे यासाठी स्वत:ला राजदत्त नाव दिले. हे सांगताना त्यांनी त्या नावामागची गोष्ट देखील सांगितली.
 
गुरुंचे राजा परांजपे यांचे स्मरण राहावे म्हणून 
 
पद्मभूषण राजदत्त म्हणाले की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत असताना मला चित्रपटसृष्टीची ओढ लागली. आणि मी स्वयंसेवक आहे हे न विसरुन राजा परांजपे यांचे बोट धरुन या क्षेत्रात आलो. ७ वर्ष त्यांच्याकडे शिकल्यानंतर १९६७ साली मी माझा पहिला स्वतंत्र चित्रपट ‘मधुचंद्र’ दिग्दर्शित केला. त्यावेळी माझ्या मनात आलं की तुला हे सगळं कुणी शिकवलं? तर ज्यांच्यामुळे तु हे सारं काही शिकलास त्याचं नाव कायम लक्षात ठेवून त्यांचा आदर ठेवला पाहिजे. त्यामुळेच माझे चित्रपटसृष्टीतील गुरु राजा परांजपे यांच्या नावातील राज आणि माझ्या खऱ्या दत्तात्रय नावातील दत्त असे नाव घेऊन मी माझ्या गुरुंचे राजा परांजपे यांचे स्मरण राहावे म्हणून समाजाला माझे नाव ‘राजदत्त’ असं केलं”.
 
कला असमाधानी असणे ही कलाकाराची खरी गरज
 
“प्रत्येक माणसाचं काळानुसार विचार आणि जगणं बदललं आहे. आजचा मनुष्य तंत्रज्ञानाच्या काळात मशीन झाला आहे. त्यामुळे मशीन न होता पुन्हा एकदा माणूस झालं पाहिजे. मराठी चित्रपटसृष्टीचा वापर हा संदेश न देता सहजतेने एखादी गोष्ट प्रेक्षकांच्या मनात बिंबवण्याचे काम नवोदित कलावंतानी करावे अशी अपेक्षा करतो. आणि कला ही असमाधाणी असणे ही कलाकाराची खरी गरज आहे. जे आपण करु शकलो त्याच्याबद्दल टिमकी वाजवत बसण्यापेक्षा स्वत:त गुंतलं पाहिजे”.
 
 
 
Powered By Sangraha 9.0