वादग्रस्त वक्तव्य भोवलं! मौलाना मुफ्ती सलमान अजहरीविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल

10 Feb 2024 16:02:41

Maulana Mufti Salman Azhari


गांधीनगर :
वादग्रस्त भाषण केल्याप्रकरणी मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांच्यावर तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजहरीविरुद्ध हा गुन्हा अरावली जिल्ह्यातील मोडासा टाउन पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अजहरीने मोडासा येथे सभा घेतली होती. त्यात त्यांनी भडकाऊ भाषण केले होते.
 
मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांनी २४ डिसेंबर २०२३ रोजी मोडासा येथे भाषण केले होते. पोलिसांनी स्वत:हून हा गुन्हा दाखल केला आहे. यावेळी अतिशय प्रक्षोभक भाषणे झाल्याने आरोपींवर ॲट्रॉसिटी कायद्याची कलमेही लावण्यात आली आहेत.
 
याआधीही अजहरीविरुद्ध गुजरातमधील जुनागढमध्ये एक तर कच्छमध्ये एक असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जुनागड प्रकरणात अटक केल्यानंतर मुफ्ती सलमान अजहरीला एक दिवसाच्या कोठडीत पाठवण्यात आले होते. मात्र, जुनागड न्यायालयाने बुधवार, ७ फेब्रुवारी रोजी त्याला जामीन मंजूर केला. त्यानंतर कच्छ पोलिसांनी त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले आणि ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मुफ्ती सलमान अजहरी सध्या पोलिस कोठडीत आहे. त्यामुळे कच्छ प्रकरणात अजहरीला जामीन मिळाल्यास पोलीस त्याला आरवली प्रकरणात अटक करणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.



Powered By Sangraha 9.0