सनातन संस्कृतीला जागतिक संस्कृती बनवण्याबाबत संतांची सरसंघचालकांसह चर्चा

10 Feb 2024 14:35:13

Sarsanghachalak (Bhopal)
(Sarsanghachalak on Sanatan Sanskriti)

भोपाळ :
मुरैना येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांत कार्यकर्ता सम्मेलनाच्या दुसऱ्या दिवशी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथील प्रमुख संतांची नुकतीच भेट घेतली. यावेळी सनातन संस्कृतीला जागतिक संस्कृती बनवण्याबाबत संतांनी सरसंघचालकांशी चर्चा केली.

चर्चेदरम्यान सरसंघचालक म्हणाले, 'संत कधीच सुप्त राहत नाहीत, ते वेळोवेळी प्रकट होऊन समाजाला मार्गदर्शन करतात.' जोपर्यंत हिंदू समाज विविध जाती-वर्गांमध्ये विभागलेला राहील, तोपर्यंत देश शक्तिशाली होणार नाही; हे देखील यावेळी चर्चेतून समोर आले. दरम्यान समाजाला सोबत घेऊन त्यांना विश्वगुरू बनविण्याच्या दिशेने वाटचाल करण्यावर भर कसा देता येईल यावर भर देण्यात आला.

जरेरुआ सरकार हरिदास महाराज, दंदरौआ धामचे महंत रामदास महाराज, पितांबरा पीठ दतियाचे मुख्य महंत विष्णुकांत मुडिया, करह आश्रमाचे महंत दीनबंधू महाराज, संत ऋषीजी महाराज, आदी संतगण यावेळी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0