पेटीएम अपयशी एअरटेल पेमेंट बँकेची सरशी!

10 Feb 2024 13:56:27

Airtel P
 
 
पेटीएम अपयशी एअरटेल पेमेंट बँकेची सरशी !
 
 
एअरटेल पेमेंट बँकेच्या नवी खात्यात मोठी वाढ. व्यवहारातही मोठी मजल
 
 

मुंबई: एअरटेल पेमेंट बँकेच्या ग्राहकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पेटीएम पेमेंट बँक संकटांनंतर ग्राहकांचा नवीन खाते उघडण्याचा कल एअरटेल पेमेंट बँकेकडे दिसून आल्याची चर्चा चालू आहे. एअरटेल पेमेंट बँक या फिनटेक सर्विसेसकडे वाढत्या ओढ्यामुळे एअरटेल फास्टटॅग सारख्या सुविधांच्या वापरात लक्षणीय वाढ झाली आहे. पेटीएम अडचणीत आल्यामुळे त्याचा फायदा एअरटेल पेमेंट बँकेला झाला आहे का याबद्दल कंपनीने कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही किंवा त्याची पुष्टीही कंपनीकडून करण्यात आलेली नाही.
 
मात्र पेटीएम पेमेंट बँकवर आरबीआयने टाकलेल्या निर्बंधांमुळे ग्राहकांना मध्ये अनिश्चितेचे वातावरण होते. पेटीएम पेमेंट बँकेच्या रक्कम देवाणघेवाण, वॉलेट, फास्टटॅग व इतर सर्विसेसवर हे निर्बंध आले होते‌. किंबहुना पेटीएमवर कुठल्याही प्रकारचे नवीन खाते उघडण्याची परवानगी आरबीआयने नाकारली होती.
 
या ग्राहकवाढी बरोबरच एअरटेल पेमेंट बँकेकडून अधिक ग्राहक संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इयर ऑन इयर बेसिसवर ४७ टक्के वाढ होत ४६९ कोटी रुपये वाढ उत्पन्नात अपेक्षित असल्याचे एअरटेल पेमेंट बँक कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
 
एअरटेल पेमेंट बँकेच्या मासिक ग्राहक व्यवहारांमध्ये ५९ लाखांनी मुदतठेवेत भर पडली असून या डिसेंबर तिमाहीत ५० टक्क्याने अधिक ठेवी वाढल्या आहेत ‌. एकूण व्यवहारांची उलाढाल २३३९ कोटी रुपये झाली असल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. सध्या एअरटेल पेमेंट बँकेचे वार्षिक व्यवहार ७ अब्जाच्या घरात पोहोचला आहे.
 
कोरोनानंतर डिजिटल पेमेंटची मोठी लाट आली होती. याच काळात फिनटेक कंपन्यांनी वेगवेगळ्या प्रकारची आर्थिक उत्पादने वाढवली असल्याने याचा लाभ मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना झाला. पेटीएम प्रकरणानंतल फायनांशियल टेक्नॉलॉजीची एक पोकळी निर्माण झाली होती. ज्याचा अधिकतम फायदा एअरटेल पेमेंट बँकेला होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा चालू आहे. कोरोनानंतर सर्वात मोठी फिनटेक कंपनी म्हणून पेटीएमचा गाजावाजा होताना आता मात्र परिस्थिती बदलली दिसत आहे. पोकळी निर्माण झालेल्या मार्केट शेअरचा नेमका फायदा एअरटेलला झाला का यावर मात्र चर्चांना उधाण आले आहे.
 
Powered By Sangraha 9.0