बरेलीमध्ये हिंसाचार! नमाज अदा करुन बाहेर पडत जमावाकडून हिंदुंना मारहाण

10 Feb 2024 15:21:14

Bareli


भोपाळ :
बरेलीमध्ये मौलाना तौकीर रझा यांच्या सूचनेनुसार, शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर बाहेर पडलेल्या जमावाने हिंदूंना मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्यांच्या वाहनांचे नुकसान, दगडफेक आणि पोलिसांचे बॅरिकेड्सही तोडल्याची माहिती समोर आली आहे. ज्ञानवापीच्या तळघरात न्यायालयाने पुन्हा पूजा सुरू करण्याबाबत दिलेल्या आदेशाच्या विरोधात मौलानाने अटक आणि 'जेल भरो' मोहीमेची घोषणा केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारपूर्वी याबद्दलचे पत्रक वाटण्यात आले होते. त्यानंतर जमाव जमला आणि गोंधळ निर्माण होऊन हिंसाचाराचा झाला.
 
याशिवाय दुकानांची तोडफोड करत जमावाने दगडफेकही केली. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांनाही पुढे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नमाजानंतर बाहेर पडलेल्या लोकांनी हिंसाचाराचा अवलंब केला आणि दुकाने उद्ध्वस्त केली.
 
श्यामगंज परिसरातून हा गोंधळ सुरू झाला असून ‘मौलाना आझाद इंटर कॉलेज’समोर उपस्थित असलेल्या दोन तरुणांना मारहाण करण्यात आली. त्यांची दुचाकी फोडल्यानंतर दगडफेक सुरू झाली. त्यानंतर मौलाना तौकीर रझा याला बिहारीपूर पोलीस चौकीजवळ अटक करण्यात आली. मात्र, पोलिसांनी त्याला तात्काळ सोडून दिले. त्यानंतर तो त्याच्या घरी गेला आणि जीआयसी सभागृहाजवळील मशिदीत नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम जमावाने 'जेल भरो' मोहीम सुरू केली. मौलाना तौकीर रझा म्हणाले की, "आपण ज्ञानवापीवरील मुस्लिम बाजूचा दावा सोडण्यास तयार आहोत, पण आधी भाजपच्या लोकांना मंदिरावर प्रेम असेल तर त्यांनी कैलास मानसरोवर चीनपासून मुक्त करावे."

Powered By Sangraha 9.0