रामराज्याची संकल्पना फक्त एका धर्मासाठी नाही : अमित शाह

10 Feb 2024 14:59:31
Amit Shah on ram mandir

नवी दिल्ली
: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून त्यात एक दिवसाची वाढ करण्यात आली आहे. भाजपने लोकसभा आणि राज्यसभेच्या आपल्या खासदारांना तीन ओळींचा व्हीप जारी केला असून त्यामध्ये सर्व खासदारांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. लोकसभेत राममंदिरावर चर्चा सुरू झाली असून राममंदिरावर धन्यवाद प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सत्यपाल सिंह यांनी श्री राम मंदिर उभारणी आणि श्री रामललाच्या अभिषेक संदर्भात चर्चेला सुरुवात केली.
 
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान जे बोलतात ते करून दाखवतात. त्यावेळी २२ जानेवारी हा ऐतिहासिक दिवस होता. पण काही लोक सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर टीका करतात. परंतु संविधानात ही रामराज्याला स्थान आहे. श्रीरामाशिवाय देशाची कल्पना नाही. म्हणूनच जगाच्या इतिहासात राम मंदिराच्या आंदोलनाचा उल्लेख होईल. पंरतु काही लोक राममंदिरावर टीका कशी करू शकतात? असा प्रश्न अमित शाह यांनी संसदेत उपस्थित केला.तसेच १० वर्षात आम्ही देशाला विकासाकडे नेलं. राम मंदिरासाठी अडवाणींनी जनजागृती केली. त्यामुळे रामराज्याची संकल्पना फक्त एका धर्मासाठी नाही. कारण रामचरित्र मानस जनमाणसाचा प्राण आहे, असे विधान देखील शाह यांनी केली.


Powered By Sangraha 9.0