झुकेगा नही साला! 'पुष्पा २'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, ४ दिवसांतच ५०० कोटी पार

09 Dec 2024 11:54:57

pushpa 2 
 
 
मुंबई : बॉक्स ऑफिस आणि प्रेक्षकांच्या मनावर सध्या एकाच चित्रपटाने अधिराज्य गाजवलं आहे तो म्हणजे अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असलेल्या 'पुष्पा २' या चित्रपटाने. देशभरात ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच १०० कोटींच्या पुढे कमाई करण्यास सुरुवात केली होती. प्रेक्षकांनी दिलेला दणकून प्रतिसादामुळे ‘पुष्पा २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील कमाईचे नवे रेकॉर्ड तयार करत इतिहास रचला आहे.
 
‘पुष्पा २’ या चित्रपटाने बुधवारी मध्यरात्री (४ डिसेंबर) १०.६५ कोटी, पहिल्या दिवशी १६४.२५ कोटी, दुसऱ्या दिवशी ९३.८ कोटी, तिसऱ्या दिवशी ११९.२५ कोटी, चौथ्या दिवशी १४१.५ कोटी कमवत आत्तापर्यंत ५२९.४५ कोटींची यशस्वी कमाई केली आहे. आत्तापर्यंत प्रदर्शनापासून केवळ ४ दिवसांत इतकी कमाई कोणत्याच चित्रपटाने केली नव्हती. त्यामुळे ‘पुष्पा २’ या चित्रपटाने ‘पुष्पा १’ चा देखील बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड मोडित काढला आहे.
 
२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा : द राईज' या चित्रपटाचा हा सीक्वेल असून 'पुष्पा २ : द रुल'नंतर ‘पुष्पा ३: द रॅम्पेज’ या तिसऱ्या भागाची देखील घोषणा करण्यात आली आहे. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फाहद फासिल या कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0