कॉर्पोरेट्स फुटबॉलमध्ये 'अॅमडॉक्स' विजयी गोलसह स्पर्धेत आगेकूच!
08 Dec 2024 17:47:04
पुणे : नुकतेच कॉर्पोरेट्सकरिता स्टँडर्ड चार्टर्ड कप २०२४ चे आयोजन करण्यात आले. पुणे येथे पार पडलेल्या फुटबॉल स्पर्धेत अॅमडॉक्सने विजय मिळविला असून FinIQ Consulting India Pvt Ltd उपविजेता ठरली आहे. या स्पर्धेत आघाडीच्या एकूण २० कॉर्पोरेट्सनी सहभाग नोंदविला.
दरम्यान, पुणे येथील स्पर्धेचे विजेते अॅमडॉक्स आता मुंबईतील राष्ट्रीय फायनलमध्ये खेळणार आहेत. यावेळी त्यांच्यासमोर अन्य सहा शहरांमधील विजेते संघ असणार आहेत. विशेष म्हणजे अंतिम सामना विजेत्या संघाला फुटबॉलच्या इतिहासातील प्रतिष्ठित इंग्लिश प्रीमियर लीगमधील लिव्हरपूल फुटबॉल क्लबचा ॲनफिल्ड अनुभवाचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे.
एका दशकाहून अधिक काळ लिव्हरपूल फुटबॉल क्लबचा मुख्य भागीदार म्हणून ‘स्टँड रेड’ असल्याचा अभिमान असलेल्या स्टँडर्ड चार्टर्डने कॉर्पोरेट फुटबॉलप्रेमींना एकत्र आणून आणि देशभरातील खेळाच्या भावनेचा सन्मान करण्यासाठी ही भागीदारी महत्त्वूर्ण असणार आहे.