'मुस्लिम मतांसाठी' काँग्रेसने गिळले मूग; बांगलादेशविरोधात चकार शब्द नाही, मायावतींचा आरोप

07 Dec 2024 16:41:34
Mayavati

लखनऊ : बांगलादेशात हिंदू, दलित, अल्पसंख्यांकांवर अन्याय होताना दिसून येत आहे. बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली आहे. या सर्व परिस्थितीत 'मुस्लिम मतांसाठी' काँग्रेस गप्प असल्याचा आरोप मायावतींनी केला आहे. शेजारच्या देशात एवढं तणावजन्य वातावरण असतानाही काँग्रेस ( Congress ) केवळ मुस्लिम मतांकडेच आपले लक्ष केंद्रित करीत आहे यातून त्यांनी काँग्रेसचा स्वार्थीपणा समोर आणून जनतेला जागरुक ठेवण्याचा प्रयत्न केला.

मायावती यांनी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि त्यांचे समर्थक हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले. पुढे त्या म्हणाल्या की, "या पक्षांनी देशातील सामाजिक आणि राजकीय संरचनेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे." या सर्व परिस्थितीत मायावती यांनी केंद्र सरकारला आपल्या कर्तव्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरुन बांगलादेशी दलित व अल्पसंख्यांकांना अजून नुकसान झेलावे लागू नये. बांगलादेशातील पिडीत हिंदू, दलित व अल्पसंख्यांकांना योग्य ती सामंजस्याची बोलणी करुन भारतात परत आणण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. काँग्रेसने याआधी ज्या चुका केल्यात त्याचाच परिणाम म्हणजे बांगलादेशात दलित व अल्पसंख्यांकांना होणारा त्रास असल्याचेही मायावती यांनी म्हटले आहे.

Powered By Sangraha 9.0