५२२-५४९ रुपये प्राइस बँडसह 'साई लाइफ सायन्सेस'चा आयपीओ बाजारात येणार!
06-Dec-2024
Total Views |
मुंबई : साई लाइफ सायन्सेस लिमिटेडचा प्रारंभिक समभाग विक्री(आयपीओ) लवकरच बाजारात दाखल होणार आहे. साई सायन्सेस लिमिटेडकडून ३,०४३ कोटी रुपये बाजार भांडवल उभारले जाणार असून गुंतवणूकदारांना कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. प्रारंभिक समभाग ऑफरच्या माध्यमातून कंपनी शेअर बाजारात सूचीबध्द होणार असून आयपीओकरिता ५२२-५४९ रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित करण्यात आला आहे.
दरम्यान, साई लाइफ सायन्सेस लिमिटेड दि. १० डिसेंबर ते १३ डिसेंबर २०२४ या कालावधीत सबस्क्रिपशनकरिता खुला असणार आहे. त्याचबरोबर, ५२२ ते ५४९ रुपये दरम्यान प्राईस बँड निश्चित करण्यात आला असून एका लॉट साइजमध्ये गुंतवणूकदारास २७ इक्विटी शेअर्स मिळणार आहेत. आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी अंतिम तारीख १३ डिसेंबरला बंद होईल.
साई लाइफ सायन्सेस लिमिटेड ही एक करार संशोधन, विकास आणि उत्पादन संस्था(सीआरडीएमओ) आहे. कंपनी स्मॉल मॉलिक्युल न्यू केमिकल एंटिटीज (एनसीई) साठी औषध शोध, विकास आणि मॅन्युफॅक्चरिंग व्हॅल्यू चेन या क्षेत्रात जागतिक फार्मा कंपन्या आणि जैवतंत्रज्ञान कंपन्यांना सेवा पुरविते.