‘पुष्पाराज’ची महाराष्ट्रातही क्रेझ, सांगलीकरांनी चित्रपटगृहात तिकीट न मिळाल्याने केली दगडफेक

06 Dec 2024 13:01:25
 
pushpa 2
 
 
सातारा : सध्या चित्रपटसृष्टीत एकाच चित्रपटाची चर्चा आहे ती म्हणजे पुष्पा २ : द रुल ची. ५ डिसेंबर २०२४ रोजी देशभरात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने दोन दिवसांत १८६.२७ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांना तुफान प्रतिसाद मिळवला आहेच पण त्यासोबत अनेक ठिकाणी राडे झालेले पाहायला मिळाले आहेत.
 
सांगलीच्या जत तालुक्यातील एका गावामध्ये पुष्पा २ पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. चित्रपटाचे सगळे शो हाऊसफुल झाले होते. पण तरीही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती. चित्रपटगृह हाऊसफुल्ल झाल्याने तिकीट बुकिंग बंद करण्यात आली आणि त्यावरुन जमलेल्या प्रेक्षकांनी केबिनवर दगडफेक केली.
 
तसेच, हैदराबाद येथे चित्रपटाच्या प्रीमीयर दरम्यानही गोंधळ झाला होता. त्यावेळी अल्लू अर्जून स्वत: चित्रपट पाहण्यासाठी आल्यामुळे त्याला पाहण्यासाठी जमलेल्या चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्यात एका महिलेचा दुर्दैवाने मृत्यू झाला. या प्रकरणी अल्लू अर्जूनवर गुन्हा दाखल झाला असून सध्या चौकशी सुरु आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0