राज्यसभेत अभिषेक सिंघवी यांच्या जागेवर नोटांचे बंडल!

06 Dec 2024 18:30:57
Abhishek Singhvi

नवी दिल्ली : शुक्रवार दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा गदारोळ पाहायला मिळाला. सभापती जगदीप धनखर यांनी सभागृहात सांगितले की, "काँग्रेस खासदाराच्या आसनातून चलनी नोटांचे बंडल सापडले आहे." यावर अध्यक्षांनी अतिरिक्त माहिती देत सांगितले की, गुरुवारी ५ डिसेंबर २०२४ रोजी सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी सीट क्रमांक २२२ वरून रोख रक्कम जप्त केली. तेलंगणातील काँग्रेस खासदार आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी ( Abhishek singhvi ) यांना ही जागा देण्यात आली आहे.

या खुलाशानंतर सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अध्यक्षांवर प्रश्न उपस्थित करत चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणाचेही नाव घेणे चुकीचे असल्याचे सांगितले. त्यांनी याला “चिल्लर हरकत” असेदेखील म्हटले आहे. यापुढे त्यांनी असे म्हटले की, "हे देशाला बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे."

तसेच अभिषेक मनु सिंघवी यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आणि म्हणाले, “मी पहिल्यांदाच याबद्दल ऐकले आहे. मी राज्यसभेत फक्त ५०० रुपयांची नोट घेऊन जातो. घटनेच्या वेळी मी सभागृहात नव्हतो." ही बाब गंभीर असल्याचे सांगून अध्यक्षांनी तपास सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले आहे.

Powered By Sangraha 9.0