मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (bangladesh turkey drone) बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचे सत्र सुरु असतानात आता बांगलादेशने नवा पराक्रम केल्याचे समोर आले आहे. पश्चिम बंगालमधील 'चिकन नेक' (सिलिगुडी कॉरिडोअर) परिसराजवळ तुर्की ड्रोन तैनात केले असून बंगालच्या सीमेवर दहशतवादी कारवाया होत असल्याच्या बातम्या येत असतानाच हा प्रकार घडला आहे. बांग्लादेशच्या संरक्षण तंत्रज्ञानानुसार तुर्कीकडून घेण्यात आलेल्या १२ ड्रोनपैकी ६ ड्रोन सध्या तैनात करण्यात आले आहेत.
हे वाचलंत का? : राष्ट्रपित्याचा अपमान! युनुस सरकारने 'शेख मुजिबुर रहमान' यांचा फोटो चलनातून हटवला
संरक्षणविषयक वेबसाइट आयटीआरडब्ल्यू आणि इंडिया टुडेच्या वृत्तानुसार हे ड्रोन बांगलादेशच्या लष्कराकडून टेहळणी आणि गुप्तचरांसाठी चालवले जात आहेत. अशा परिस्थितीत भारतही अलर्टमोडवर असून बांगलादेशच्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून आहे. वास्तविक बांगलादेशसोबत सुरू असलेल्या तणावामुळे भारतीय सैन्य आधीच हाय अलर्टवर आहे आणि युनूस सरकार सीमेवर काय करत आहे यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.