संभळ आणि बांगलादेशातील दंगेखोरांचा डीएनए एकच! : योगी आदित्यनाथ

06 Dec 2024 14:36:43

Yogiji on Sambhal Bangladesh Connection

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Sambhal Bangladesh Connection)
बांगलादेशातील हिंदूंवर सातत्याने होत असलेल्या अत्याचाराबाबत देशभरात निषेध मोर्चे काढले जात आहेत. याचदरम्यान अयोध्येत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठे विधान केले आहे. 'मूठभर आक्रमकांमुळे देश गुलाम झाला, हिंदू तेव्हाच संघटित झाला असता तर अशी परिस्थिती उद्भवली नसती. संभल आणि बांगलादेशमध्ये जे काही घडत आहे त्यातील दंगेखोरांचा डीएनए सारखाच असल्याचे ते म्हणाले.

हे वाचलंत का? : ...तर बांगलादेशचे लोकच युनूस सरकारची कातडी सोलतील : सुवेंदू अधिकारी

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बांगलादेशातील घटनांचा उल्लेख करत पुढे म्हणाले, शेजारील देशात इस्लामिक कट्टरपंथी ज्यापद्धतीने अल्पसंख्याकांवर हल्ले करत आहेत, त्याबाबत कोणाला गैरसमज असेल तर बाबरच्या सेनापतींनी ५०० वर्षांपूर्वी अयोध्येत जी कृत्ये केली, जो प्रकार संभलमध्ये घडला आणि आज बांगलादेशात जी परिस्थिती उद्भवली आहे, त्या तिघांचाही डीएनए सारखाच आहे. आजही समाजाच्या जडणघडणीला तडा देणारे लोक येथे उभे आहेत. सामाजिक एकात्मता भंग करण्याची पूर्ण व्यवस्था ते करत आहेत.
Powered By Sangraha 9.0