...तर बांगलादेशचे लोकच युनूस सरकारची कातडी सोलतील : सुवेंदू अधिकारी

    06-Dec-2024
Total Views |

Suvendu Adhikari on Bangladesh

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Suvendu Adhikari on Bangladesh)
"भारत बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून नाही, पण जर आपण आपल्या देशातून बटाटे, कांदा, अंडी यांसह ९७ वस्तू बांगलादेशला पाठवणे बंद केले तर. तर त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसेल. असे झाल्यास बांगलादेशातील जनताच हैराण होऊन युनूस सरकारची कातडी सोलतील.", असे म्हणत पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते आमदार सुवेंदू अधिकारी यांनी बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गुरुवारी कोलकाता येथील धर्मतल्ला परिसरात सनातनी समाजाने आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

हे वाचलंत का? : बांगलादेशात ७०० कैदी फरार, लष्कर कैद्यांना पकडण्यास ठरले असमर्थ

सुवेंदू अधिकारी पुढे म्हणाले, "एकदा आपण पेट्रापोल सीमा बंद केल्या होत्या तेव्हा बांगलादेश सरकारला मजबूत धक्का बसला होता. बांगलादेशी हिंदू आयातदार आणि निर्यातदारांच्या म्हणण्यानुसार भारताने सात दिवस माल पाठवणे बंद केले तर बांगलादेशची स्थिती अत्यंत बिकट होईल. ज्याप्रमाणे बांगलादेशात युनुस सरकार आहे, त्याचप्रमाणे बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे सरकार आहे. देशभरातील हिंदूंना बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी एकत्र येण्याछी खरी गरज आहे."